पोलिसांसोबत काम करणाऱ्या होमगार्डवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:39+5:302021-06-21T04:22:39+5:30

माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने येथील पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे ...

Time of starvation on homeguards working with the police | पोलिसांसोबत काम करणाऱ्या होमगार्डवर उपासमारीची वेळ

पोलिसांसोबत काम करणाऱ्या होमगार्डवर उपासमारीची वेळ

माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने येथील पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे महापुरुषांची जयंती, सण-उत्सव किंवा संवेदनशील वातावरणात बंदोबस्तासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाते. हे जवान पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी असतात. नाइलाज तसेच आज किंवा उद्या मानधन मिळेल, या आशेवर ते काम करत आहेत. मागील १५-१६ महिन्यांपासून कोरोना काळात हे होमगार्ड भीतीयुक्त वातावरणात रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु या विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत त्यांचे मानधन वेळेत दिले जात नाही. जानेवारीपासून मानधनच मिळालेले नसल्याचे गृहरक्षक दलाच्या जवानांनी सांगितले. सध्या महागाई वाढलेली असताना आणि वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माजलगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात मिळून ६० होमगार्ड कार्यरत आहेत तर बीड जिल्ह्यात ७५० पेक्षा जास्त होमगार्ड कार्यरत आहेत. या सर्वांचे मानधन रखडले आहे.

Web Title: Time of starvation on homeguards working with the police