शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल-लॅपटॉप गायब अन् कारची अदलाबदल! तहसीलदार गिड्डे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले; तपास आता गुन्हे शाखेकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 18:01 IST

तपासाचा रोख आता घातपाताकडे! तहसीलदारांचे महत्त्वाचे साहित्य गायब झाल्याने संशयाची सुई अधिक गडद.

केज : केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाचे सस्पेन्स दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. पहाटेच्या अंधारात टोलनाका ओलांडताना गाडीत असलेली 'ती' रहस्यमय दुसरी व्यक्ती आणि अपघातानंतर घटनास्थळावरून गायब झालेला मोबाईल, लॅपटॉप व टॅब यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी हा तपास रेणापूर पोलिसांकडून थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

तपासातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे वाहनांची अदलाबदल. बुधवारी (दि. ८) रात्री साडेआठ वाजता अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सेलूअंबा टोलनाका ओलांडताना जी कार सीसीटीव्हीत कैद झाली आणि ज्या कारचा रेणापूरजवळ भीषण अपघात झाला, त्या दोन्ही कार वेगवेगळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला प्रवासात कार बदलण्याची गरज का भासली? या प्रवासात त्यांच्यासोबत तिसरी व्यक्ती दुसरी कार घेऊन चालली होती का, यादृष्टीने आता गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर भावसार तपास करत आहेत.

'त्या' सोबत्याचा शोध घेण्याचे आव्हानटोलनाक्यावरील फुटेजमध्ये तहसीलदार गिड्डे यांच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. मात्र, अपघातानंतर केवळ गिड्डे यांचाच मृतदेह सापडला. ती दुसरी व्यक्ती कोण आणि अपघाताच्या वेळी ती कुठे होती, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली होती, त्यानंतरच हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

तपासातील चार प्रमुख संशयास्पद दुवेसाहित्याची चोरी : अपघातानंतर गिड्डे यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब गायब होणे घातपाताची शक्यता वर्तवते.वाहनांची अदलाबदल : टोलनाका ओलांडलेली कार आणि अपघात झालेली कार वेगळी असणे हा तपासातील मुख्य केंद्रबिंदू आहे.मिस्टर 'एक्स' कोण?: प्रवासात सोबत असलेली दुसरी व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता कशी झाली?दोन कारचे गूढ : प्रवासात तहसीलदारांसोबत दुसरी एक कार पाठलागावर किंवा सोबतीला होती का?

सखाेल तपासानंतर अधिक स्पष्टता येईलकेज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. वेगवेगळ्या बाजूंनी सखाेल तपास केला जात असून, घटनाक्रम आणि अपघात, अशा दाेन्ही बाबींची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत अधिक स्पष्टता समाेर येईल.-अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर

English
हिंदी सारांश
Web Title : Mysterious death: Missing devices, car swap deepen official's accident probe.

Web Summary : A fatal accident involving Tahsildar Rakesh Gidde is under investigation. Key points: missing devices, swapped cars, and a mysterious passenger. Police are investigating possible foul play, focusing on inconsistencies in the vehicle and the missing person.
टॅग्स :TahasildarतहसीलदारBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याlaturलातूरRevenue Departmentमहसूल विभाग