अंबाजोगाईत गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:32+5:302021-08-22T04:36:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने शनिवारी दुपारी ...

Symbolic funeral of a gas cylinder at Ambajogai | अंबाजोगाईत गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

अंबाजोगाईत गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने शनिवारी दुपारी अंबाजोगाई बसस्थानकासमोर गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने अंबाजोगाईत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुलोचना आरसुडे, तालुकाध्यक्षा अंजली पाटील, शहराध्यक्षा नंदिनी सानप, जिल्हा उपाध्यक्ष सविता जाधव यांनी हे आंदोलन केले. यावेळी महिलांनी गॅस, पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा शहरातून काढली. केंद्र सरकारच्या भाववाढ धोरणाचा निषेध व्यक्त केला. महागाई कमी करा, या मागणीचे निवेदन तहसीलदार विपीन पाटील यांना दिले.

आंदोलनात रेणुका लोहार, हिना शेख, पल्लवी घुगे, राणी लोहार, शीला कांबळे, तुळजा आळणे, जयदीपा काळे, अनुराधा कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

210821\img-20210821-wa0106.jpg

गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने शनिवारी दुपारी अंबाजोगाई बसस्थानकासमोर गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

Web Title: Symbolic funeral of a gas cylinder at Ambajogai