शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य पथकाचे कसबा भागात सर्वेक्षण- A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

धारूर : शहरातील कसबा भागात आठवड्यापासून डेंग्यूचा फैलाव झाल्याने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग व तालुका आरोग्य अधिकारी ...

धारूर : शहरातील कसबा भागात आठवड्यापासून डेंग्यूचा फैलाव झाल्याने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग व तालुका आरोग्य अधिकारी डाॕॅ. शहाजी लोमटे यांच्यासह साथरोग पथकाने सोमवारी सकाळ दिवसभर स्थळ पाहणी केली. सर्वेक्षण करून नागरिकांना योग्य ते सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील कसबा भागात रुग्णसंख्या वाढण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषदेने शनिवारी या भागात धूर फवारणी तसेच काही भागात स्वच्छता केली होती. सोमवारी डॉ. मिर्झा बेग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी शिनगारे गल्ली, वीर पांडुरंग चौक, धनगर वाडा, जाधव गल्ली येथे साथ रोग नियंत्रण पथकाने सूक्ष्म तापीच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले. नवीन संशयित ताप रुग्ण सर्व्हेक्षण, कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थाने, गप्पी मासे पैदास केंद्रांची पाहणी करून नागरिकांना मार्गदर्शक सूचना देण्यात अल्या. या पथकामध्ये पी. एस. घाडगे, सी. एस. ठोंबरे, एच. डी. सानप, मनीषा सोनवणे, सुनील तिडके आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी हाेते. पाणी साठ्यात गप्पी मासे सोडा धारूर शहरातील कसबा भागातील नागरिकांनी आपल्या घरातील टाक्यातील पाण्यात गप्पी मासे सोडून डासांची उत्पत्ती थांबवावी, असे अवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांनी केले. कोरडा दिवस पाळावा शहरातील डास उत्पत्ती स्थाने, दूषित स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. नागरिकांनी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळून डासांची उत्पत्ती थांबवावी, असे अवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी केले.

190721\5224img-20210719-wa0096.jpg

आरोग्य विभागाचे कसबा विभागात सर्वेक्षण