शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई काही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईकाही वर्षांपूर्वी लाखो रुपये मोजूनही डी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नव्हता. गेल्या पाच वर्षात डी. एड. होऊन गुरुजी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल पाहून या अभ्यासक्रमाला आता विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. बीड जिल्ह्यात २०५० डी.टी.एड. (डी.एड.) जागांपैकी केवळ ५१६ अर्ज प्राप्त झाले आहे. प्रवेशप्रक्रिया संपली तरी १५३४ जागा अजूनही रिक्त आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील जागांचा प्रश्न तर मोठा भेडसावणारा आहे. दहा वर्षांपूर्वी १२ वी बोर्डाच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण मिळाले तरच शासकीय कोट्यातून विद्यार्थ्यांना डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत होता. कमी गुण असणारे विद्यार्थी लाखो रुपये मोजून व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवत होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी संस्थाचालकांचे उंबरठे झिजवूनही प्रवेश मिळवणे अवघड होते. मात्र, आता ही स्थिती उलटी झाली आहे. आता संस्था चालकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी पालकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अध्यापक विद्यालयांची वाढती संख्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे वाढली आहे.या वाढत्या खाजगी अध्यापक महाविद्यालयांमुळे डी.एड. चा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली अन् नौकरीची संधी कमी. याचा परिणाम म्हणून डी.एड.च्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. बीड जिल्ह्यात एकूण ३५ अध्यापक महाविद्यालय आहेत. यात दोन अध्यापक महाविद्यालय तर एक अनुदानित उर्वरित ३० अध्यापक महाविद्यालय विनाअनुदानित आहेत. बीड जिल्ह्यात डी.एड.च्या एकूण २०५० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे ७३१ अर्जांची विक्री झाली. या अर्जांपैकी केवळ ५१६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रवेशप्रक्रिया संपत आली तरी अजूनही १५३४ जागा बीड जिल्ह्यात रिकत आहेत. याशिवाय प्रत्येक विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालयाचा व्यवस्थापन कोटाही शिल्लक असल्यामुळे अध्यापक महाविद्यालयाची अवस्था विद्यार्थ्याविना अत्यंत दयनीय झाली आहे. शिक्षकांना धरू लागले वेठीसडी.एड. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळत नसल्याने या संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकांना संस्थाचालकांनी वेठीस धरले आहे. काहीही करा, कसेही करा, विद्यार्थी मात्र आणा अशा सक्त सूचना संस्था चालकांनी शिक्षकांना बजावल्या आहेत. त्यामुळे नोकरी आणि विद्यार्थी या दोन्हीच्या कात्रीत अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक सापडले आहेत. अनेक विद्यार्थी वळाले स्पर्धा परीक्षेकडेगेल्या तीन वर्षात सीईटीच झालेली नसल्याने डी. एड. केलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळले आहेत. शिक्षक म्हणून काम मिळाले तरी वेतन मिळणे दुरापास्त असल्याने व हातात डिग्री असूनही संस्थाचालकांना लाखो रुपयांचा अर्थपूर्ण व्यवहार करून नोकरी मिळवण्यापेक्षा हा अभ्यासक्रमच नको असा समज निर्माण झाला आहे.