मेडिकलच्या नावाखाली काहींची फिरस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST2021-05-31T04:24:26+5:302021-05-31T04:24:26+5:30

अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्या आहेत. शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यात ...

Some revolt under the name of medical | मेडिकलच्या नावाखाली काहींची फिरस्ती

मेडिकलच्या नावाखाली काहींची फिरस्ती

अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्या आहेत. शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यात अत्यावश्यक सेवेला सूट दिली आहे. याचाच फायदा घेत काही जण औषधे खरेदी करण्याच्या नावाखाली बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे.

महामार्गावर पाणपोई सुरू करावी

बीड : महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याने महामार्गावर असणारे धाबे, हॉटेल्स बंद आहेत. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांनाच पाणी विकत घेणेही शक्य नसते. त्यामुळे समाजसेवी संस्था व विविध पक्ष, संघटना यांनी वाटसरूंसाठी महामार्गावर पाणपोई सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण

बीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासी मार्ग निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारलेले हे निवारे शासकीय असतानाही त्याचा वापर अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेसारखा होऊ लागला आहे. संबंधित विभागांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लपूनछपून अनेक व्यवसाय सुरूच

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. अनेक कडक नियम लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. असे असले तरीही शहरातील अनेक भागांत व्यावसायिक आपली दुकाने लपूनछपून सुरूच ठेवत आहेत. पोलिसांनी अशा अनेकांवर कारवाई केली. तरीही पुन्हा चोरून लपून व्यवसाय सुरूच आहेत.

पाणीटंचाईबाबत उपाययोजना करा

बीड : तालुक्यात या वर्षी चांगला पाऊस होऊनही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. अजूनही अनेक गावांमध्ये अधिग्रहणाची आवश्यकता आहे. तेथे प्रशासनाने सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Some revolt under the name of medical