शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काही बाबतीत ‘नाही’ म्हणायचे धाडस करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST

शिरूर कासार : किशोर वयात काही समज येण्याआधीच आपण नको त्या गोष्टी करून भविष्याची बरबादी करून पश्चाताप करण्याची ...

शिरूर कासार : किशोर वयात काही समज येण्याआधीच आपण नको त्या गोष्टी करून भविष्याची बरबादी करून पश्चाताप करण्याची वेळ येते. हा धोका मुलांप्रमाणे मुलींना सुद्धा घातक ठरतो. किशोरवयीन मुला- मुलींनी आमिषाला बळी न पडता काही बाबतीत नाही म्हणायचे धाडस करावे, असे मार्गदर्शन येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किशोरावस्थेतील मुला-मुलींना देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी सर्व बाबी मुद्देसूद हाताळून मोलाचे मार्गदर्शन केले. १५ ते १९ या वयोगटांतील मुलांना व मुलींना किशोरवयीन समजले जाते. हे वय असे असते की आपण करत असलेल्या चुकांचे परिणाम त्यांच्या लक्षात येत नाही यातून मोठे भरून न निघणारे नुकसान होत असते. नेमके हेच टाळण्यासाठी व बालविवाह आणि त्याचे परिणाम याबद्दल डॉ. अशोक गवळी, एस. बी. वाघूलकर, बी. जे. ढाकणे, एस. आर. जोगदंड यांनी मार्गदर्शन केले.

दवाखान्यातील पलंग स्वर्ग नव्हे

बालविवाह टाळणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. स्वच्छतेबाबतही सूचना देण्यात आल्या. आकर्षणापोटी प्रलोभन, आमिष दाखवित एकमेकांना किशोरवयीन बोलत असतात. प्रामुख्याने यातून व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका असतो. मात्र हे या वयात लक्षात येत नाही. धूम्रपान, मद्यपानाच्या आहारी जातात व दुसऱ्यालाही प्रवृत्त केले जात असते. अशावेळी किशोरवयीन मुलांनी नाही म्हणण्याचे धाडस केले पाहिजे. धूम्रपानासंदर्भात दवाखान्यातील पलंग म्हणजे स्वर्ग आहे का ? अशा शब्दांत समज देणे गरजेचे आहे. अशा अनेक बाबी यावेळी सांगण्यात आल्या.

अशा बाबी घातकच

आपण करतो ते कोणालाच माहिती होणार नाही, ही गोष्ट दोघांमध्येच राहील असे बोलणे घात करू शकते, किशोरवयीन गर्भारपण शारीरिक दृष्ट्या विपरित परिणामकारक ठरते. याबरोबर भ्रूणहत्या, स्त्रियांवरील हल्ला, ऑनर किलिंग, जबरदस्ती बालविवाह, लग्नासाठी अपहरण, घरगुती हिंसा ,घालून पाडून बोलणे, मारझोड करणे, शोषण, अत्याचाराचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर व प्रगतीवर होत असल्याचे सांगण्यात आले.