शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळांची भटकंती चालते आठ महिने - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ आल्याचे चित्र ग्रामीण भागात दरवर्षीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार :

शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ आल्याचे चित्र ग्रामीण भागात दरवर्षीच दिसत असते. शिरूर कासार तालुक्यातही रस्त्यावर आणि शेतामध्ये मेंढपाळ आल्याचे दिसत आहे. या मेंढपाळांची वर्षातून आठ महिने भटकंती सुरू असते. तर फक्त पावसाळ्यात चारच महिने त्यांना हक्काच्या घराचा सहवास लाभतो. फिरतीच्या काळात घोड्यावर संसार व संरक्षणासाठी प्रामाणिक कुत्रे सोबतीला असते.

शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यानंतर त्या जमिनीत मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आणत असतात. पिके निघाल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपली जमीन नांगरतात. त्याठिकाणी जनावरांना खाण्यासाठी कोणताही चारा राहत नाही. त्यामुळे मेंढपाळांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय राहात नाही. आठ दिवस, पंधरा दिवस, तर कधी महिन्यानंतर त्यांना आपला गाव बदलावा लागतो. याकाळात मेंढ्यांच्या लेंड्या व मूत्र शेतासाठी चांगले खत म्हणून कामी येत असल्याने स्थानिक शेतकरी शेतात सहारा देतात. प्रसंगी खानपानाची सोयसुध्दा करीत असतात. दिवाळीनंतर सुरू झालेली भटकंती जूनमध्ये पाऊस आल्यानंतरच थांबते.

पावसाळ्यातील चार महिने आपल्या गावी राहिल्यानंतर पुन्हा भटकंती सुरू होते.

===Photopath===

240521\5038vijaykumar gadekar_img-20210524-wa0030_14.jpg

===Caption===

शिरूरकासार तालुक्यात रस्त्यावर आणि शेतामध्ये मेंढपाळ आपली मेंढरे चारताना दिसत आहेत.