शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दोन चोरट्यांकडून सात दुचाकी केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:36 IST

सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई परिसरातून दोन दुचाकी चोरांना अटक केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांध्ये वाढ झाली आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून या चोरांचा शोध सुरु होता. दरम्यान सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई परिसरातून दोन दुचाकी चोरांना अटक केली आहे. या कारवाईमुळे इतर चोऱ्यांची देखील उकल होण्याची शक्यता आहे.स्थानिक गुन्हे शाखा पथक माजलगाव येथील दरोडा प्रकरणाचा तपास गेवराई परिसरात करत होते. यावेळी जातेगाव (ता.गेवराई) येथे दुचाकी चोरी करणारे दोघेजण आहेत. अशी माहिती खब-यामार्फत मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी जातेगाव येथे जाऊन. पाहणी केली तसेच चौकशी केल्यानंतर येथील बाळु महादेव मिंदर आणि देविदास लिंबाजी पवार या दोन दुचाकी चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने आपण दुचाकी चोरी करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे.बीडमधील परळी परिसरातून एक दुचाकी चोरी गेली होती. ती या चोरट्यांनी चोरल्याचे उघडकीस आले. तसेच येरमाळा (जि. उस्मानाबाद) अंबड ( जि. जालना) येथून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. महादेव मिंदर आणि देविदास पवार यांना यांना पुढील तपासासाठी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विजय गोसावी, कर्मचारी तुळशीराम जगताप, जयसिंह वाघ, भास्कर केंद्रे, विकास वाघमारे, कैलास ठोंबरे, सतिष कातखडे, चालक हारके, वंजारे, हराळे यांनी केली.३ लाखाचा मुद्देमाल केला लंपासजातेगाव येथून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ३ लाख किंमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच इतर काही चोरीच्या दुचाकी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर याच्यांकडून इतर ठिकाणी कुठे गुन्हे केले आहेत का ? यासह दुचाकी चोरल्यानंतर त्याची विक्री कुठे केली जात होती याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत.

टॅग्स :bikeबाईकThiefचोरArrestअटकCrime Newsगुन्हेगारी