कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे; उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत मांडला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:54 IST2025-03-27T12:51:02+5:302025-03-27T12:54:37+5:30
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली.

कराडसह गँगच्या विरोधात सबळ पुरावे; उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत मांडला घटनाक्रम
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बुधवारीबीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला. तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले. हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोर्पीच्या वकिलांनी अर्ज करून केली. आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
९ डिसेंबर २०२४ संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत.
पुराव्यांसाठी अर्ज
- आरोपींचे वकील अँड. विकास खाडे यांनी डिजिटल पुराव्यासह सर्व माहिती मागितली होती. २६ मार्च रोजी देणार, असे मागच्या सुनावणीत सांगितले होते. ती सर्व कागदपत्रे मिळण्यासाठी कराड याच्या वकिलांनी नवा अर्ज केला.
- आरोपींची व्हीसीद्वारे हजेरी : या प्रकरणातील वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींची व्हिसीद्वारे हजेरी घेतली.
- यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे. केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण बीड चालवावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीडच्या न्यायालयात झाली.