१५ दिवसांत लॅपटॉपचा अहवाल येणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकिलाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:18 IST2026-01-24T15:17:37+5:302026-01-24T15:18:16+5:30
बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी नियमितपणे होत आहे.

१५ दिवसांत लॅपटॉपचा अहवाल येणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकिलाची माहिती
बीड : केज तालुक्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली, पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. फॉरेन्सिक लॅबकडे देण्यात आलेल्या लॅपटॉपचा रिपोर्ट पुढील १५ दिवसांत प्राप्त होईल, असा दावा सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विशेष मकोका न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी दरम्यान केला.
बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी नियमितपणे होत आहे. लातूर येथील कारागृहात असलेले आरोपी विष्णू चाटे याने बीड जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्यासाठीचा अर्ज केला आहे. त्या अर्जावर सरकारी पक्षाने अद्याप आपले म्हणणे सादर केले नाही असे बचाव पक्षाचे म्हणणे आहे तर हा विषय न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसून तो कारागृह प्रशासनाच्या अख्यत्यारित असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. ७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वकील कोल्हे तर आरोपींच्या वतीने ॲड. सचिन शेप, ॲड. राहुल मुंडे उपस्थित होते.