शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कृष्णा आंधळेला पोलिसांनी वान्टेड घोषित केला; पथकांना अजूनही सापडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:38 IST

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांची पथकांनी महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात त्याचा शोध सुरू केला आहे. पण, अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. यामुळे आता पोलिसांनी कृष्णा आंधळे यांला वान्टेड घोषित केले आहे. त्याला शोधून देणाऱ्याला बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. 

तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कालपासून वाल्मीक कराड याची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला सर्दी आणि ताप आला आहे. यामुळे आता कोर्टाने CPAP मशिन वापरण्यास कोर्टाने मंजूरी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता तपासाला आणखी वेग आला आहे. 

मोठी बातमी: खंडणीनंतर मकोकाच्या गुन्ह्यातही वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सीआयडीसह आता एसआयटीही तपास करत आहे. काही दिवसापूर्वी एसआयटीमधील अधिकारी बदलण्यात आले. काही दिवसापूर्वी वाल्मीक कराड विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता आज कोर्टाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

वाल्मीक कराड याला व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्याला सर्दी आणि ताप असल्याचे समोर आले.

हत्या होऊन महिना उलटला

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. ही हत्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, या आरोपींना अपहरण करुन हत्या केली. ही हत्या होऊन एक महिना उलटला आहे. पण अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.  सर्व आरोपींवर मकोका लावला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचादेखील यात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबाने आंदोलन केले होते. त्यानंतर कट रचल्याचा ठपका ठेवत कराडवरदेखील मकोका लावण्यात आला. एकूण नऊ आरोपींवर मकोका लागला असून, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मकोका लावताना सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख केले आहे. कराड हा सदस्य आहे.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwalmik karadवाल्मीक कराड