बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:08 IST2025-11-14T12:07:26+5:302025-11-14T12:08:03+5:30

महसूल पथकाने ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; हल्ल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा

Sand mafia's brutality in Beed; JCB attacked revenue team in Ashti, attempted to kill Tehsildar | बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

आष्टी (जि. बीड) : आष्टी तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांनी सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई केली आहे. मात्र, कारवाईनंतर महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे.

तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत सीना नदीपात्रात संगमेश्वर मंदिराजवळ, हिंगणी येथे अवैध गौण खनिज व वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासह छापा टाकला. या कारवाईत महसूल पथकाने एक पिवळ्या रंगाचा जेसीबी, नंबर नसलेले तीन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि घटनास्थळी साठवलेली ३० ब्रास वाळू, असा एकूण ५१ लाख ३ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. पथकामध्ये तलाठी राजकुमार आचार्य (मातकुळी), प्रवीण शिंदे (चिखली), स्नेहल थेटे (खडकत), योगेश गोरे (धानोरा), मंडळ अधिकारी सुभाष गोरे, महसूल सहायक दिलीप गालफाडे आणि महसूल शिपाई कुंदन बावरे यांचा समावेश होता.

कर्मचाऱ्यांवर हल्ला
जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना, आष्टी शहरातील खडकत चौकात फॉरेस्ट ऑफिसजवळ तीन अनोळखी इसम क्रेटा (एमएच ४२ बीई ०७७६) गाडीतून आले आणि त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. वाळू माफियांनी कर्मचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून घेतला आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शुभम करडुळे व इतरांनी आणखी काही वाहने आणून महसूल पथकाच्या ताब्यातून एक ट्रॅक्टरचे हेड/धुड जबरदस्तीने पळवून नेले. पथकातील तलाठी प्रवीण शिंदे आणि इतरांना चापटांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या गंभीर घटनेनंतर तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : बीड में रेत माफिया की गुंडागर्दी, तहसीलदार पर जानलेवा हमला

Web Summary : बीड में अवैध रेत खनन पर कार्रवाई के दौरान रेत माफिया ने तहसीलदार और उनकी टीम पर हमला कर दिया। जेसीबी से कुचलने की कोशिश की और जब्त संपत्ति छीन ली। पुलिस ने मामला दर्ज किया।

Web Title : Sand mafia attacks Tehsildar in Beed, attempts to kill her.

Web Summary : In Beed, sand mafia attacked a Tehsildar and her team during an illegal sand mining raid. They tried to run them over with a JCB and assaulted officials, stealing seized property. Police have registered a case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.