बेलगावचा रस्ता दुरूस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:32 IST2021-03-19T04:32:53+5:302021-03-19T04:32:53+5:30

स्वच्छतेची मागणी बीड : शहरातील नगर रोड परिसरात तहसील कार्यालयासमोर असलेल्या गटारी तुंबत आहेत. त्यामुळे मोठा पाऊस आल्यानंतर गटारीचे ...

Repair the road to Belgaum | बेलगावचा रस्ता दुरूस्त करा

बेलगावचा रस्ता दुरूस्त करा

स्वच्छतेची मागणी

बीड : शहरातील नगर रोड परिसरात तहसील कार्यालयासमोर असलेल्या गटारी तुंबत आहेत. त्यामुळे मोठा पाऊस आल्यानंतर गटारीचे पाणी नगर रोडवर जमा होते. तसेच तहसील परिसर जलमय होतो. स्वच्छतेची मागणी नागरिकांतून होत आहे.

मजूर शोधण्याची वेळ

धारूर : तालुक्यात सध्या गहू व इतर पिके काढणीस वेग आला आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे शेतात गहू व इतर पीक काढणीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. तसेच इतर शेती कामे करण्यासाठीही मजुरांची शोधाशोध सुरू आहे.

नियमांची एैशीतैसी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय. यामुळे रस्ता वाहतुकीस अरूंद होत आहे.

रस्त्यावर पार्किंग

बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग होत आहे. यामुळे रस्ता वाहतुकीस अरूंद होत आहे. या पार्किंगला शिस्त लावण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Repair the road to Belgaum