अंबाजोगाईत डॉक्टरांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:29+5:302021-06-01T04:25:29+5:30

लोकमत न्यूृज नेटवर्क अंबाजोगाई : लातूर येथे कोरोनाचे उपचार सुरू असताना आंतरवासिता डॉ. राहुल पवार यांचा बळी गेला. विमा ...

Protests of doctors in Ambajogai | अंबाजोगाईत डॉक्टरांची निदर्शने

अंबाजोगाईत डॉक्टरांची निदर्शने

लोकमत न्यूृज नेटवर्क

अंबाजोगाई : लातूर येथे कोरोनाचे उपचार सुरू असताना आंतरवासिता डॉ. राहुल पवार यांचा बळी गेला. विमा सुरक्षा कवच असते तर त्यांचे कुटुंब कर्जबाजारी झाले नसते. शासनाच्या दुर्लक्षामुळे हा बळी गेला. या घटनेचा निषेध नोंदवत सोमवारी अंबाजोगाईतील आंतरवासिता डॉक्टरांची ‘अस्मि’ या संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली.

संघटनेने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता यांना दिले. सोमवारी दिवसभर आंतरवासिता डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले. दुपारी आंतरवासिता डॉक्टरांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरात निदर्शने केली. हे आंदोलन अस्मि संघटनेचे सचिव डॉ. श्रीराम धोंड यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनात डॉ. शुभम धांडे, डॉ. आदित्य गर्जे, डॉ. राजकुमार खिचडे, डॉ. स्वप्नजा गव्हाणे, डॉ. पल्लवी घाटे यांच्यासह आंतरवासिता डॉक्टर्स सहभागी झाले होते.

.....

आमचा वाली कोण?

कोरोनाच्या काळात आम्ही आंतरवासिता डॉक्टर्स वरिष्ठ डॉक्टरांच्या आदेशानुसार जिथे सांगतील तिथे काम करतो. आमच्यातील अनेक जण कोरोना कक्षातही सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना आमच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. यासाठी शासनाने आम्हाला पाठबळ द्यावे.

- डॉ. श्रीराम धोंड, सचिव, अस्मि संघटना, अंबाजोगाई.

Web Title: Protests of doctors in Ambajogai