खासगी डॉक्टर देणार कोविड कक्षात सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:09+5:302021-04-13T04:32:09+5:30

अंबाजोगाई : कोरोनाचा भयंकर प्रकोप बीड जिल्हा सध्या अनुभवत आहे. अंबाजोगाई हा तर कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. अशा बिकट ...

Private doctor will provide services in Kovid room | खासगी डॉक्टर देणार कोविड कक्षात सेवा

खासगी डॉक्टर देणार कोविड कक्षात सेवा

Next

अंबाजोगाई : कोरोनाचा भयंकर प्रकोप बीड जिल्हा सध्या अनुभवत आहे. अंबाजोगाई हा तर कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. अशा बिकट वेळी प्रशासन हतबल झालेले असताना अंबाजोगाई इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी आपल्या सर्व सहकारी डॉक्टर्स बांधवांना कल्पना देत लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात आपापली सेवा देण्याची विनंती केली.

अध्यक्षांच्या विनंतीला मान देत बहुतांश डॉक्टरांनी ही सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे.

डॉ. नवनाथ घुगे, डॉ. गोपाळ पाटील, डॉ. शुभदा लोहिया, डॉ. एन. पी देशपांडे ,डॉ. सचिन चाटे, डॉ. अविनाश मुंडे, डॉ. विवेक सुवर्णकार या फिजिशियन इंटेनसिविस्टसह इतर शाखांचे विविध तज्ज्ञ डॉक्टरही सेवा देण्यास तयार झाले आहेत.

गेल्यावर्षी ही या सर्व डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी पाळत कोविड रुग्णालयात एक महिना कोविड रूग्णांना सेवा देत त्यांचे मनोबल वाढवले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे हे कार्य संपूर्ण भारतात आदर्शवत ठरत आहे. राष्ट्रीय आपत्तीत डॉ राजेश इंगोले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कोरोना बाधित रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा मिळाला असून या निर्णयाबद्दल डॉ राजेश इंगोले,सचिव डॉ. विजय लाड, डॉ. सचिन पोतदार ,डॉ. राहुल डाके, डॉ. उद्धव शिंदे आदींचे स्वागत होत आहे.

===Photopath===

120421\avinash mudegaonkar_img-20210412-wa0026_14.jpg

Web Title: Private doctor will provide services in Kovid room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.