शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वेडेपणाचा बनाव टिकला नाही; अल्पवयीन मुलीवर हल्ला करणाऱ्या रोडरोमिओला सक्तमजुरी शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 20:11 IST

चाकू हल्ल्यानंतर आरोपी दगड मारणार तेवढ्यात तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडल्याने पिडीतेचा जीव वाचला.

ठळक मुद्देअंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकालवेडाच्या भरात कृत्य केल्याचा बनाव

अंबाजोगाई : आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला सोमवारी (दि.१५) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्या.सुप्रिया सापटनेकर यांनी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. चार वर्षापूर्वी परळी शहरात ही भयावह घटना घडली होती. सतीश वसंत मंत्रे असे त्या रोडरोमिओचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली असता वाटेत सतीशने तिची छेड काढून जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या पिडीतेने झालेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी सतीशच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या सतीशने पीडिता सकाळच्या वेळी शाळेत जात असताना तिला वाटेत अडवले. यापूर्वीची घटना तू घरी का सांगितलीस असे म्हणत तिला शिवीगाळ करत सोबत आणलेल्या चाकूने तिच्या पोटावर वार करून तिला गंभीर जखमी केले. 

त्यानंतर रोडवर पडलेल्या पिडीतेच्या डोक्यात मारण्यासाठी त्याने मोठा दगड उचलला. परंतु, सतीश दगड मारणार तेवढ्यात तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडल्याने पिडीतेचा जीव वाचला. नागरिकांनी पिडीतेला तातडीने रुग्णालयात पाठविल्याने तिच्यावर वेळेत उपचार होऊ शकले. याप्रकरणी सतीश मंत्रे याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरिक्षक डी.बी. काळे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यालयात सादर केले.

या खटल्याची सुनावणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या.सुप्रिया  सापटनेकर यांच्या न्यायालयासमोर झाली. दोन्ही बाजूंची युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सतीश मंत्रे यास दोषी ठरवून त्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील २५ हजार रुपये पिडीतेस नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अशोक कुलकर्णी यांनी काम पहिले. त्यांना ॲड. डी.डी. लांब आणि ॲड. एन.एस. पुजदेकर व पैरवी चौधर यांनी सहकार्य केले.

वेडाच्या भरात कृत्य केल्याचा बनावसदरील हल्ला सतीश मंत्रे याने वेडाच्या भरात केल्याचा बचाव सुनावणी दरम्यान करण्यात आला. परंतु, सतीशला बारावीला चांगले गुण मिळाले आहेत, तो नोकरी करतो, तसेच सोबत दोन मुली असताना त्याने फक्त पिडीतेवरच हल्ला केल्या. त्यावरून हे कृत्य त्याने जाणूनबुजून केले असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याआधारे न्यायालयाने सतीशचा बचाव फेटाळला आणि त्याला दोषी ठरवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग