पशुवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:44+5:302021-06-22T04:22:44+5:30

कडा : आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण केल्याने या परिसरातील वातावरण निसर्गरम्य होणार आहे. ...

Plantation in veterinary clinic | पशुवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण

पशुवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण

कडा : आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण केल्याने या परिसरातील वातावरण निसर्गरम्य होणार आहे.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विष्णू साबळे, अंकुश तळेकर, प्रा.संजय खंडागळे उपस्थित होते.

....

अरुंद पुलामुळे धोका

कडा : आष्टी-कडा रोडदरम्यान वटणवाडी, कारखाना दरम्यान दोन पूल आहेत. एका पुलाला जुना बायपासदेखील आहे. परंतु हा पूल अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताचा धोका आहे. यासाठी जुना बायपास रस्ताही खुला करावा, अशी मागणी होत आहे.

...

पावसाने दिली ओढ, शेतकरी चिंतेत

आष्टी : तालुक्यातील कडा, आष्टी परिसरात रोहिणी, मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. पिके उगवून आली आहेत. परंतु आता पावसाने ओढ दिली आहे. येत्या चार-दिवसात पाऊस आला नाहीतर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Web Title: Plantation in veterinary clinic