गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST2021-07-26T04:30:25+5:302021-07-26T04:30:25+5:30

बीड : आहेर वडगाव येथील निसर्गभूमी संवर्धन संस्थेच्या ‘शिवराई’ प्रकल्पामध्ये इंजि. सीताराम कदम, संयोगिता कदम व प्रणिता दहीभाते कुटुंबाच्यावतीने ...

Plantation for Gurupourni | गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

बीड : आहेर वडगाव येथील निसर्गभूमी संवर्धन संस्थेच्या ‘शिवराई’ प्रकल्पामध्ये इंजि. सीताराम कदम, संयोगिता कदम व प्रणिता दहीभाते कुटुंबाच्यावतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. बेहडा, भोकर, आवळा, पिंप्री, मोह अशा पाच प्रकारच्या अकरा झाडांचे वृक्षारोपण श्रमदान करून करण्यात आले. आपल्या भावी पिढ्यांना निसर्ग व पर्यावरणाची ओळख करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजा

बीड : गुरुपौर्णिमेनिमित्त सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पाद्यपूजा करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, ज्येष्ठ समाजसेवक भास्करराव टाक, संकेत सतीशराव बेदरे, वैभव बेदरे आदी उपस्थित होते.

240721\173924bed_3_24072021_14.jpg~240721\173924bed_4_24072021_14.jpg

         ~         

Web Title: Plantation for Gurupourni