शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

परळी-बीड रेल्वेमार्गाच्या कामाची पंकजा मुंडे यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:28 IST

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाच्या परळीपासून सुरू झालेल्या कामाची पाहणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाच्या परळीपासून सुरू झालेल्या कामाची आज पाहणी केली. पाहणीनंतर रेल्वे आणि महसूल अधिका-यांच्या बैठकीत या संपूर्ण कामाचा आढावा घेतला. सदर काम जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. २६१ किमी. लांबीच्या या मार्गावर केंद्र व राज्य सरकारचे मिळून २८५६ कोटी रूपये खर्च होणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे व खा डॉ प्रीतम मुंडे हया सध्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कसोशीने प्रयत्न करत आहेत. २०१९ अखेरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे धावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश येईल, असे पंकजा म्हणाल्या.परळीत केली कामाची पाहणीनगर-बीड प्रमाणेच रेल्वेमार्गाचे काम परळीपासूनही सुरू करावे, अशी सूचना पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार कांही महिन्यांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परळीत या कामाला सुरूवात झाली होती. आज पंकजा मुंडे यांनी एन.एच. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठिमागील बाजूस सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी चेमरी विश्रामगृहात रेल्वे व महसूल विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.परळी ते बीड या ९० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून माती भराव, सपाटीकरण, लहान मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढील वर्षाखेरीस पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असून काम वेळेत व जलदगतीने पुर्ण करावे अशा सूचना त्यांनी केल्या.या बैठकीस उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक परळी, गणेश नि-हाळी पाटोदा, प्रियंका पवार माजलगांव, जिल्हा कृषी अधीक्षक चपळे, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी अभियंता योगेश गरड, वरिष्ठ अभियंता सत्येंद्र कुंवर, तहसीलदार शरद झाडके आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेPankaja Mundeपंकजा मुंडे