एमबीबीएस प्रवेशासाठी पावणेसात लाख रुपये दिले, अॅडमिशनही नाही मिळाले पैसेही गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:58 IST2024-01-29T18:55:00+5:302024-01-29T18:58:01+5:30
आंध्रप्रदेशातील एका विरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एमबीबीएस प्रवेशासाठी पावणेसात लाख रुपये दिले, अॅडमिशनही नाही मिळाले पैसेही गेले
परळी- एमबीबीएस च्या शिक्षणा साठी मुलास प्रवेश मिळून देतो म्हणून दोन वर्षापूर्वी पावणे सात लाख रुपये उकळन्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवेश पण दिला नाही व पैसेही परत दिले नाही यावरून आंध्र प्रदेशातील एका जणाकडून फसवणूक झाल्याची तक्रार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नागापूर येथील हनुमंत सोळंके यांनी 28 जानेवारी 2024 रोजी केली आहे. याप्रकरणी आंध्रप्रदेशातील आचार्य वेंकटरमना याच्या विरोधात 29 जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
परळी तालुक्यातील नागापूर येथील हनुमंत प्रभाकर सोळंके यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 28 जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील निसना पेठ येथील आचार्य वेंकटरमना यांने विश्वास संपादन करून मुलास एमबीबीएसला खाजगी कॉलेजला अॅडमिशन करून देतो असे सांगितले. यासाठी नगदी व बॅंकखात्यावर 6 लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र, मुलाला अॅडमिशन दिले नाही. तसेच पावणे सात लाख रुपयांची रक्कमही परत दिले नाही. हा प्रकार एक डिसेंबर 2022 रोजी घडला आहे. याप्रकरणी 28 जानेवारी रोजी हनुमंत सोळंके यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आचार्य वेंकटरमना च्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परळी ग्रामीणचे पोलीस जमादार केकान करीत आहेत.