शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी परळीच्या विकासासाठी केंद्रीय सत्तेचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

परळी : विरोधकांनी विकासकामांत राजकारण न करता आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, ...

परळी : विरोधकांनी विकासकामांत राजकारण न करता आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, असा खोचक सल्लाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता विरोधकांना दिला.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी शहर बायपास या रस्त्याच्या चार पदरी डांबरीकरणाचे व परळी ते धर्मापुरी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन शनिवारी पालकमंत्री मुंडे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. संजय दौंड, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, नगराध्यक्षा सरोजनी हलगे, जि. प. गटनेते अजय मुंडे, न. प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपक देशमुख, शिवाजी सिरसाट, पं. स. सभापती बालाजी मुंडे, सभापती ॲड. गोविंदराव फड, प्रदीप ठोंबरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री मुंडे म्हणाले, परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना सुरुवात झाली. ही कामे ८ महिन्यांच्या आतच व तेही अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशा सूचना पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित कंत्राटदारांना भाषणाच्यादरम्यान दिल्या. परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे. परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धूळमुक्त करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

लातूर, नांदेडच्या धर्तीवर विकास करू

मलकापूर ते वाका या भागातील ११ साठवण तलावांच्या पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा झाला असून, या माध्यमातून या भागातील आणखी ३५ % क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परळीचा लातूर व नांदेड शहरांच्या धर्तीवर विकास करण्याचे आपले स्वप्न असल्याचे पालकमंत्री मुंडे म्हणाले. सूत्रसंचालन गोविंद केंद्रे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत कंत्राटदाराच्यावतीने प्रदीप ठोंबरे यांनी केले.

...तर थर्मलमध्ये सोलरचा प्लांट

थर्मल पॉवर प्लांटमधील काही संच कोळसा व अन्य अडचणींमुळे बंद करण्यात आले आहेत. मात्र आपण ऊर्जा विभागाशी याबाबत चर्चा केली असून, तितक्याच क्षमतेचे सोलर प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.