९ वर्षांनी एक तर १८ वर्षांनंतर मिळाले दोन आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:27+5:302021-06-01T04:25:27+5:30

बीड : मागील १८ वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी या पदावर दोघांची नियुक्ती ...

One after 9 years and two health officers after 18 years | ९ वर्षांनी एक तर १८ वर्षांनंतर मिळाले दोन आरोग्य अधिकारी

९ वर्षांनी एक तर १८ वर्षांनंतर मिळाले दोन आरोग्य अधिकारी

बीड : मागील १८ वर्षांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी या पदावर दोघांची नियुक्ती झाली आहे. तसेच ९ वर्षांपासून रिक्त असलेल्या माता व बालसंगोपन अधिकाऱ्यांच्या जागीही एका महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अवर सचिव वि.पूं.घाेडके यांनी सोमवारी आदेश काढले आहेत. महत्त्वाचे तीन अधिकारी येणार असल्याने ग्रामीण यंत्रणा आणखी बळकट होणार आहे.

बीडच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अनेक महत्त्वाची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त होती. यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांच्याकडे होता. आता या पदावर जळगाव येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ.जयवंत मोरे येणार आहेत. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच देण्यात आला होता. आता या पदावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.शेख रोफ अब्दुल रहमान हे येणार आहेत. हे दोन्ही पदे जवळपास २००३ पासून रिक्त होते. त्यापाठोपाठ ९ वर्षांपासून रिक्त असलेल्या माता व बालसंगोपन पदाचा अतिरिक्त पदभार गेवराईचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय कदम यांच्याकडे होता. आता या पदावर पुणे येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य डॉ.स्वाती कांबळे या येणार आहेत. या तीनही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी निघाले आहेत. बीडमधील एकाही अधिकाऱ्याचा यात समावेश नसल्याचे सांगण्यात आले. आता हे अधिकारी कधी रूजू होतात, याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डॉ.कांबळे या रूजू होण्यास अनुत्सूक असून, इतर दोन्ही अधिकारी आठवडाभरात पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: One after 9 years and two health officers after 18 years