कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:16 IST2025-12-19T12:15:22+5:302025-12-19T12:16:46+5:30

अहिल्यानगर पोलीस दलातील जवान सुदाम पोकळे यांचा अपघातात मृत्यू; बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हळहळला

on duty death of Young police officer Sudam Pokale dies after being hit by speeding vehicle | कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत

कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत

कडा: आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी असलेले आणि अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (२९) यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली.

सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुदाम पोकळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा (ता. आष्टी) येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार आहे.

Web Title : ड्यूटी पर तैनात युवा पुलिसकर्मी की हिट एंड रन में मौत, शोक की लहर

Web Summary : कर्जत के राशिन में गश्त के दौरान तेज रफ्तार वाहन की टक्कर से 29 वर्षीय पुलिस अधिकारी सुदाम पोकले की तत्काल मौत हो गई। अहिल्यानगर पुलिस बल में शोक है। उनका गांव चिंचला उनकी असामयिक मृत्यु पर शोक व्यक्त कर रहा है।

Web Title : Tragedy Strikes: Young Policeman Killed in Hit-and-Run While on Duty

Web Summary : Police officer Sudam Pokale, 29, died instantly in a hit-and-run accident while patrolling in Rasin, Karjat. The speeding vehicle struck him during his duty, leaving behind a grieving family and shocked colleagues in the Ahilyanagar police force. His village, Chinchala, mourns his untimely demise.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.