स्वच्छता होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:31 IST2021-04-14T04:31:06+5:302021-04-14T04:31:06+5:30

सिग्नल बंद अवस्थेत बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल ...

Not clean | स्वच्छता होईना

स्वच्छता होईना

सिग्नल बंद अवस्थेत

बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेकवेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती, परंतु दुरूस्ती झालेली नाही.

गतिरोधकाची दुरवस्था

बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा या सपाट झालेल्या गतिरोधकामुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करीत आहेत.

श्वानांचा त्रास वाढला

बीड : शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

गुरांचा ठिय्या

बीड : शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर तसेच गल्लीबोळात मोकाट गुरे रस्त्यावरच ठिय्या मांडत बसत आहेत. यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असून, डोकेदुखी वाढत आहे.

Web Title: Not clean