शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांकडून निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर परिसरात वनविभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड मोठ्या ...

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर परिसरात वनविभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांचे फाटे तोडून नेत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वन विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे.

उन्हाची तीव्रता वाढली

बीड : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. वाढत्या उन्हामुळे थंडपेयाची मागणी व उन्हापासून संरक्षण करणाऱ्या टोप्यांची विक्री सुरू झाली आहे.

सुधारित वेतनाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय घेऊन बराच कालावधी लोटला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत शासनाने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केली नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हे सुधारित वेतन लागू करावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा.

घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित

अंबाजोगाई : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या वतीने विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील मुडेगाव, राडी, दैठणा, आपेगाव, राडीतांडा, तडोळा या परिसरातील अनेक लाभार्थींना अजूनही अनुदान मिळाले नाही. या परिसरातील लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.

शहरातील बँकांमध्ये गर्दी कायम

बीड : शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खाजगी बँका यांची संख्या मोठी आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकांच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. याशिवाय बँकेत कोरोनाविषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.