शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील पोलीस बळ वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST

बीड : ‘२६ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार १२९७........ पोलीस कर्मचाऱ्यांवर’ असे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. त्याचा आधार ...

बीड : ‘२६ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार १२९७........ पोलीस कर्मचाऱ्यांवर’ असे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. त्याचा आधार घेत जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात २८ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही २१९७....... इतकी आहे. मात्र, जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास २६ लाख १० हजार इतकी आहे. दरम्यान, यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. कर्मचाऱ्यांची असलेली कमी संख्या व जिल्ह्यातील गुन्हेगारी यातदेखील तफावत आहे. चोरी, घरफोडी, दुखापत करणे, दरोडे, अत्याचार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातदेखील वाढ होत असल्याचा उल्लेख आ. नमिता मुंदडा यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी व गस्तीसाठी नवीन वाहने व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. मुंदडा यांनी गृहमंत्री, राज्यमंत्री व गृहविभाग मुख्य सचिव व प्रधान सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.