शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

गेवराई : कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि त्यापासून उद्भवणारी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवावीत, असे ...

गेवराई : कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि त्यापासून उद्भवणारी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवावीत, असे आवाहन येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेश शिंदे यांनी केले. त्यामुळे कोणीही घाबरण्याची गरज नाही. म्युकरमायकोसिस (बुरशी) आजार संसर्गजन्य नसून, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरोना आजार होऊन गेलेल्या नागरिकांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात डॉ. शिंदे बोलत होते. आ. लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले, राजेंद्र राक्षसभुवनकर, जानमोहंमद बागवान, ॲड. घुंबार्डे, डाॅ. सराफ, डाॅ. आंधळे, डाॅ. मिसाळ, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाजू, डाॅ. कोटेचा, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे, दादासाहेब गिरी, संजय आंधळे, नगरसेवक कानगुडे, सभापती भरत गायकवाड, जिजा खंडागळे, स. बद्रुदीन, महेश सौंदरमल, करण जाधव आदींची उपस्थिती होती.

न.प. सभागृहात झालेल्या आरोग्य शिबिरात डॉ. राजेश शिंदे यांनी म्युकरमायकोसिस आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोणताही आजार हा रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो. त्याचे निदानही होते. वातावरणात पूर्वीपासून जिवाणू ,विषाणू आहेत. बुरशी आजार दुर्मिळ असल्याचे ते म्हणाले.

डॉ. शिंदे यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिळ्या ब्रेडच्या तुकड्यांना बुरशी दिसते. बुरशी वातावरणात सुद्धा असते. परंतु, हा आजार एका माणसाकडून दुसऱ्याला होत नाही. या आजाराचे विषाणू हवेतून फुप्फुसात आणि जखमेतून शरीरात जातात. त्यामुळे, लाल डोळे होणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या, धाप लागणे, खोकल्यातून रक्त, किडनीवर सूज येण्याची लक्षणे दिसून येतात. असे असले तरी नागरिकांनी घाबरू नये. महामारीतून बरे झालेल्या नागरिकांनी महिना ते दीड महिना स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. त्रास जाणवला की, उशीर करू नये. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. बचावासाठी नागरिकांनी हातात हातमोजे घालावेत. पायात शूज घालावेत. काही दिवस शेतात काम टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. महिनाभर घरातच आराम करून, चांगला आहार घ्यावा, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.

शहर व परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उपस्थिती लावली. ॲड. राजेंद्र राक्षसभुवनकर यांनी आभार मानले.

फोटो :

गेवराई येथे कोरोना आजार होऊन गेलेल्या नागरिकांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर.