शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गच्चीवर सुरू झालाय मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

कोरोनाची भिती अंबेजोगाई : कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहता यावे, गर्दी टाळता यावी, यासाठी अंबेजोगाई शहरातील अनेक महिला व नागरिकांनी ...

कोरोनाची भिती

अंबेजोगाई : कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहता यावे, गर्दी टाळता यावी, यासाठी अंबेजोगाई शहरातील अनेक महिला व नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवरच मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकला पसंती दिली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अजूनही कडक नियम लागूच आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडूनही रस्त्यावर काम नसताना फिरणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घराच्या गच्चीवर फिरत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात आहे. कोरोनामुळे मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. अंबेजोगाई तालुक्यात या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून सतत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघड ठरते, तर सार्वजनिक ठिकाणी मैदानावर सततच्या पावसामुळे चिखल झाल्याने फिरता येईना, शिवाय या ठिकाणी चिखल झाल्यास फिरताना अपघाताचा संभाव्य धोका आहे, तसेच रोडवर फिरायचे, तर सतत वाहनांची वर्दळ, रस्त्यावर होत असलेली गर्दी, यातून उद्‌भवणारा कोरोनाचा संसर्ग हे सर्व टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या घराच्या गच्चीचाच आधार मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी घेतला आहे. शहरात सकाळी व संध्याकाळी अनेक जण गच्चीवर फिरताना आढळून येत आहेत.