शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमधील नर्सचा विनयभंग; ब्रदरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील दीड महिन्यांपासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री अपरात्री कोणीतरी दरवाजा ठोठावून जात असे. त्यांनी ...

पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील दीड महिन्यांपासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री अपरात्री कोणीतरी दरवाजा ठोठावून जात असे. त्यांनी पाळत ठेवली असता त्यांच्यासोबत ब्रदर म्हणून काम करणारा अर्जुन अनंत फड (रा. दौंडवाडी, ता. परळी) हा दरवाजा ठोठावताना दिसून आला. दुसऱ्या दिवशी पीडितेने अर्जुनला जाब विचारला असता, तो तुमच्यासोबत लग्न करायचे म्हणू लागला. पीडितेने त्यास विवाहित असल्याचे सांगून यानंतर त्रास न देण्यासाठी बजावले. परंतु, अर्जुनने त्यांचा सतत पाठलाग सुरू केला आणि काहीतरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करून त्रास देऊ लागला. मंगळवारी रात्री ८.३० वाजता पीडिता ड्युटीवरून घरी परतली असता अर्जुनने घरात घुसून तिचा विनयभंग केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा करण्याची धमकी दिल्याने अर्जुन तिला जिवे मारण्याची धमकी देत निघून गेला. याप्रकरणी पीडितेच्या आरोपावरून अर्जुन फड याच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मोनाली पवार या करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला असून, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.