शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ॲप लावणार अपघातांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी भारत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारच्या एकात्मिक रस्ते अपघात डाटाबेस प्रकल्प म्हणजेच इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डाटाबेस (आयआरएडी) सर्व राज्यात राबविण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी व इतर असे मिळून १०० जणांनी या संदर्भातील प्रशिक्षण घेतले असून, राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांत बीड जिल्ह्याचे काम सर्वोत्तम आहे.

ज्या ठिकाणी अपघात होईल त्या ठिकाणची माहिती पोलीस, आरटीओ, आरोग्य आणि रस्ते महामार्ग प्रमुख यांनी इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डाटाबेस (आयआरएडी) या ॲपवर भरायची आहे. त्यामुळे सर्व कामकाज हे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे अपघातस्थळावरील सर्व माहिती या ॲपद्वारे रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे असणार आहे. त्यावरून अहवाल तयार करून अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी व इतर काही असे मिळून १०० जणांना या संदर्भात एनआयसीमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या संदर्भातील सर्व कामकाज प्रशिक्षण वाहतूक शाखेचे प्रमुख व या मोहिमेचे नोडल ऑफिसर सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांनी पाहिले आहे.

...

जिल्ह्यातील रस्ते अपघात

वर्ष २०१९ अपघात ५९५ जखमी ४२० मृत्यू ३५३

वर्ष २०२० अपघात ५५५ जखमी ३५३ मृत्यू ३२९

वर्ष २०२१ अपघात ३०२ जखमी २३५ मृत्यू १८९

जिल्ह्यातील सरासरी अपघात ६००

....

असे चालणार कामकाज

आयआरएडी या प्रकल्पाचे कामकाज असे चालणार आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला आहे, तेथील दोन कर्मचारी व एक अधिकारी घटनास्थळावर दाखल होतील. त्यानंतर अपघाताचे छायाचित्र, व्हिडिओ दिलेल्या ॲपवर अपलोड केले जाईल. त्यानंतर याच प्रकारे इतर माहिती आरोग्य, आरटीओ व महामार्ग अधिकारी भरणार आहेत. यामध्ये अपघात का झाला, कारण काय होते, अशा स्वरूपाचे सर्व विश्लेषण केले जाणार आहे.

.....

तज्ज्ञांच्या माध्यमातून होणार संशोधन

या प्रकल्पातून संकलित केलेल्या माहितीचे आयआयटी चेन्नई व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) याचे संशोधन व विश्लेषण करणार आहे. यावेळी अपघात झालेली ठिकाणे जसे रस्ते दुभाजक, उड्डाणपूल, रस्ते संरचना यांचा अहवाल संबंधित जिल्ह्यास पाठवून रस्ते अपघात रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात येणार आहेत.

....

१०० जणांना प्रशिक्षण

या प्रकल्पासाठी निवड झालेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी व एका अधिकाऱ्यांसह इतर १०० जणांना एनआयसीमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अपघात झाला तर त्याची माहिती यापुढे या ॲपच्या माध्यमातून अपलोड करण्यात येणार आहे.

.....

रस्ते अपघात रोखण्यासाठी भारत सरकारच्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या ॲपमुळे जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

....