घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:21 IST2021-05-24T08:21:15+5:302021-05-24T08:21:36+5:30

बीड तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकीला अगोदर विजेचा धक्का लागला व नंतर घरातील एका खोलीला आग लागल्याने मायलेकींचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

Mileki's death due to electric shock in the house | घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू

घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू

पुरुषोत्तम करवा / सुशांत आगे
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकीला अगोदर विजेचा धक्का लागला व नंतर घरातील एका खोलीला आग लागल्याने मायलेकींचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ (६५) व त्यांची लेक सखुबाई शेषराव फपाळ (४५) या दोघी राहत असत. सकाळी सहा वाजता उठल्यानंतर सखुबाई दूध आणायला गेली होती. ती दूध घेऊन आल्यानंतर या दोघींपैकी एकीला विजेचा धक्का बसला. त्यावेळी दुसरी वाचविण्यासाठी गेली असता दोघींनाही धक्का बसला. याचदरम्यान विजेची ठिणगी पडल्याने दोन खोल्यांपैकी एका खोलीत आग लागल्याचे सांगण्यात येते. या घटनेत दोघी होरपळून जागीच ठार झाल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या दोघींचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Mileki's death due to electric shock in the house