शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खरबूज, टरबुजाला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST

खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी अंबाजोगाई - राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली आहे. ...

खाजगी वाहनांमध्ये मर्यादित प्रवासी

अंबाजोगाई - राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्बंधात वाहतुकीला सूट देण्यात आलेली आहे. मात्र, त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. याचे पालन खाजगी प्रवासी वाहतूकदार करीत आहेत. खाजगी टॅक्सीमध्ये केवळ चार प्रवासी बसविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनाही सुरक्षिततेची हमी मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

मंगल कार्यालये, लॉन बंदच

अंबाजोगाई : लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मंगल कार्यालये, लॉन व मंगल सेवावाल्यांना बसला आहे. तसेच या व्यवसायाशी संलग्न असणारे अनेक व्यावसायिक आहेत. ऐन लग्नसराईच्या वेळी व्यवसाय बंद झाल्याने हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. यामुळे परवानगी नसलेली मंगल कार्यालये, लॉन व मंगल सेवावाल्यांना त्यांचे व्यवसाय नियमांनुसार सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मंगलसेवा व्यावसायिक सुनील जाधव यांनी केली आहे.

वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवा

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सध्या विजेच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. मांजरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या वीज उपकेंद्रातून होणारा विद्युत पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात यावी. तरच शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होईल, अन्यथा पाण्याची उपलब्धता असूनही पिकांना पाणी मिळणार नाही. यासाठी क्षमता वाढवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

कृषी माल वितरण व्यवस्था उभारावी

अंबाजोगाई - कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे एका बाजूला शेतमाल विक्रीचे आव्हान तर दुसऱ्या बाजूला कमी झालेले दर यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून कृषी माल वितरण व्यवस्था उभारणीसाठी शासनस्तरावर योग्य विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ख्वाजामियाँ पठाण यांनी केली आहे.