शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तहसीलमध्ये तोंडी आदेशाने काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST

माजलगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून माजलगाव तहसीलमध्ये वाळू चोरीसंदर्भात कारवाईचे नाट्य खेळून गडगंज होत असलेल्या अधिकारी ...

माजलगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून माजलगाव तहसीलमध्ये वाळू चोरीसंदर्भात कारवाईचे नाट्य खेळून गडगंज होत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांबाबतीत नागरिकांत कुजबूज आहे. त्यात तहसीलदारांच्या धक्कादायक विधानाने भर पडली आहे. आठवडाभरापूर्वी पकडलेली डस्ट हायवा तोंडी आदेशाने रात्रीतून सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेवरून माजलगाव तहसीलमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून तोंडी आदेशाने डोके वर काढल्याच्या प्रकारास दुजोरा मिळत आहे.

तहसीलच्या पथकाने आठवडाभरापूर्वी डस्टची हायवा गाडी टालेवाडी फाट्याजवळ दुपारी पकडली होती. दरम्यान गाडी माजलगाव तहसील आवारात आणून उभी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदारांकडून संबंधित गाडीवर व गाडीमालकावर पंचनामा करून कारवाई होणे अपेक्षित होते; परंतु दररोज चालढकल करून कारवाई लांबवण्यात आली. असे का करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण होत असतानाच मंगळवारी रात्रीतून ही गाडी सोडून देण्यात आली.

याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांना विचारणा केली असता उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या तोंडी आदेशाने गाडी सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना विचारणा केली असता, ही फाइल माझ्या टेबलवर आलीच नाही. असल्या कुठल्याही गोष्टी तोंडी आदेशाने होत नसतात. याची चौकशी करू असे ते म्हणाले. दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्या या दुटप्पी विधानांमुळे कोण खरे आणि कोण खोटे बोलतोय, याबाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, महसूल अंतर्गत वाळू वाहनांवर कारवाईचे नाट्य रंगत आहे. वाहने पकडायची, परंतु कागदोपत्री दाखवायचे नाही आणि नंतर तोडीपाणी करून सोडून देण्यात येत असल्याची चर्चा कर्मचारी दबक्या आवाजात करत आहेत. दरम्यान, तहसीलच्या तालुक्यात तोंडी आदेशाच्या अजब फतव्याने चर्चेला उधाण आले असून, ‘दाल में कुछ काला है’ अशी चर्चा होताना दिसत आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देऊन तहसीलमधून निघणाऱ्या तोंडी आदेशास लगाम लावण्याची आवश्यकता असल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे.