माजलगाव नगरपरिषदेचा 'लाचाधिकारी'; चंद्रकांत चव्हाण ६ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:59 IST2025-07-10T22:58:30+5:302025-07-10T22:59:42+5:30
माजलगाव पालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण सहा लाखांची लाच घेताना जाळ्यात

माजलगाव नगरपरिषदेचा 'लाचाधिकारी'; चंद्रकांत चव्हाण ६ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
बीड / माजलगाव : माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. गुरुवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास माजलगावमधील पिताजी नगरी येथील त्यांच्या किरायाच्या घरात ही कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेत गुत्तेदाराच्या कामाशी संबंधित फाईल मंजूर करण्यासाठी चव्हाण यांनी 12 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर सहा लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला. यात चव्हाण हा जाळ्यात अडकला
बीडचे दोन पथक मदतीला
कारवाईनंतर बीड एसीबीलाही माहिती देण्यात आली. त्यानंतर बीड एसीबीच्या दोन पथकांनी रात्री उशीरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेतली. मात्र झडतीत नेमके काय मिळाले? हे समजू शकले नाही.
सासऱयाच्या जीवावर रुबाब
चव्हाण हा भाजपच्या माजी आमदारांचा जावई आहे. त्यामुळेच टो बेधडकपणे टक्केवारीची मागणी करत असल्याचा आरोप गुत्तेदारांकडून होत आहे. त्यांच्या अटकेने माजलगावमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाई नंतर अनेक गुत्तेदात त्याच्या घरी जमले होते.