शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता होत्याचं नव्हतं झालं; माजलगावमध्ये झोका खेळताना ९ वर्षांच्या वृंदाचा दुर्दैवी अंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:27 IST

घरच्या घरी खेळताना होणाऱ्या अशा लहान अपघातांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

माजलगाव (जि. बीड): घरात झोका खेळण्यासाठी गेलेल्या एका नऊ वर्षीय चिमुकलीचा झोक्याचा फास बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरात मंगळवारी घडली. वृंदा समीर रुद्रवार असे मृत चिमुकलीचे नाव असून, या घटनेमुळे रुद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वृंदा ही येथील ईगलवुड शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत होती. सुट्टीच्या दिवशी घडलेल्या या अपघाताने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

खेळाचे रुपांतर मृत्यूच्या फासातशहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची नात वृंदा (वय ९) आपल्या लहान बहिणीसह घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या झुल्यावर खेळण्यासाठी गेली होती. तेथे एका खुर्चीवर चढून झोका हातात घेत असताना अचानक खुर्ची खाली कलंडली आणि झोक्याची दोरी वृंदाच्या गळ्याला अडकली. यामध्ये तिचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

आईने पाहिले आणि हंबरडा फोडलाबऱ्याच वेळानंतरही वृंदा जेवण्यासाठी खाली येत नसल्याने तिची आई तिला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. तेव्हा तिला वृंदा लटकलेल्या अवस्थेत दिसली. आईने फोडलेला हंबरडा ऐकून वडील, आजी आणि आजोबांनी तातडीने धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चुणचुणीत आणि गोंडस असलेल्या वृंदाच्या जाण्याने शाळेतील शिक्षक आणि वर्गमित्रांनाही मोठा धक्का बसला आहे.

पालकांसाठी धोक्याची घंटाघरच्या घरी खेळताना होणाऱ्या अशा लहान अपघातांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. मुलांनी झोका खेळताना किंवा उंचावर खेळताना मोठ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वृंदाच्या मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरताच नातेवाईक आणि नागरिकांनी रुद्रवार यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Majalgaon: 9-Year-Old Dies in Swing Accident

Web Summary : A 9-year-old girl in Majalgaon died tragically after a swing accident at home. Vrinda Rudrawar, a second-grader, was found by her mother hanging from the swing. Despite being rushed to the hospital, she was declared dead, leaving the family and community devastated.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड