शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:59 IST

Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. यावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. 

जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

आमदार क्षीरसागर यांनी खंडणीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाला आहे असा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली. 

'एबीपी माझा' या वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार क्षीरसागर यांनी ही मागणी केली. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, पहिल्या दिवशी मी जेव्हा मस्साजोग गावात आलो होतो, तेव्हा मी हीच मागणी केली होती. लोकांच्या मनात रोष आहे. वाल्मीक कराड या गुन्ह्यातील मास्टरमाइंड आहे, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी या प्रकरणाची मागणी सभागृहात केली आहे, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले. 

"वाल्मीक कराड याला ३०२ मध्ये घेतले नाहीतर लोक रस्स्यावर उतरतील. लोकांच्या रोष आहे. लोकांना कोणीही बोलावून घेतलेले नाही, त्यांचे ते येत आहेत. आज टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केले. एखादा कोण टाकीवरुन पाय घसरुन पडला असता तर काय झाले असले. लोकांनी आधी टॉवरवर चढून आंदोलन करणार म्हणून सांगितलं पण ते पाण्याच्या टाकीतवर चढले. हे आंदोलन एका जातीचे नाही, सत्ताधारी पक्षातील नेतेही या प्रकरणावर बोलत आहेत, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले. 

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा: क्षीरसागर

"सगळी लोक त्यांच्याविरोधात बोलत आहेत. तरीही काहीही होत नाही. त्या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड ते असूनही जर त्यांच नाव येत नसेल तर त्यांना कुठेतर संरक्षण त्या मंत्रि‍पदाच भेटत आहे. ते फिल्मी स्टाइलने येतात आणि सरेंडर होतात. याचा अर्थ कुठेतरी संरक्षण आहे, हा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे,अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर