मनोरुग्ण मुलाची जन्मदात्यांना अमानुष मारहाण; आईचा मृत्यू, वडील कोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:23 PM2021-06-20T14:23:22+5:302021-06-20T14:24:57+5:30

लोकांकडून बघ्याची भूमिका; अनेकजण होते व्हिडीओ काढण्यात दंग.

maharashtra beed son beating parents people taking video social media mother died father in comma | मनोरुग्ण मुलाची जन्मदात्यांना अमानुष मारहाण; आईचा मृत्यू, वडील कोमात

मनोरुग्ण मुलाची जन्मदात्यांना अमानुष मारहाण; आईचा मृत्यू, वडील कोमात

Next
ठळक मुद्देलोकांकडून बघ्याची भूमिकाअनेकजण होते व्हिडीओ काढण्यात दंग.

आई-वडिलांना मुलानंच अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. यामध्ये मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीनं आणि दगडानं मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ बीडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुलगा हा मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर व्यक्ती आपल्या आई-वडिलांना मारहाण करत असताना ते दांपत्य मदतीसाठई याचना करत होतं. परंतु लोकांनी बघ्याची भूमिका घेतली आणि काही जण या घटनेता व्हिडीओ काढण्यात दंग होते. मुलाकडून झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला असून वडिलही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सदर घटना शनिवारी संध्याकाळी बीड जिल्ह्यातील एका गावाक घडली. त्र्यंबक आणि शिवबाई खेडकर असं या दांपत्याचं नाव आहे. त्यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीत त्र्यंबक खेडकर हे गंभीर जखमी झाले असून आई शिवबाई खेडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा हा मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, त्यांना मारहाण होत असताना दांपत्य मदतीसाठी याचना करत होते. परंतु त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. तर काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: maharashtra beed son beating parents people taking video social media mother died father in comma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app