कमी दाबाने वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:55+5:302021-03-13T04:59:55+5:30

गतिरोधकांमुळे त्रास बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ...

Low pressure power supply | कमी दाबाने वीज पुरवठा

कमी दाबाने वीज पुरवठा

गतिरोधकांमुळे त्रास

बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळात तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते, तसेच अपघाताचा धोका संभवतो. यामुळे तयार केलेले अनधिकृत गतिरोधक काढण्याची मागणी होत आहे.

काटेरी झुडपांचा त्रास

राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे तोडण्याची मागणी वाहनधाकांतून होत आहे.

नियमांची एैशीतैसी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय. यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

पर्यावरण धोक्यात

अंबाजोगाई : शहर परिसरात वीटभट्ट्या आहेत. परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Low pressure power supply