शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतने महाराष्ट्राशी रक्ताचे नाते केले निर्माण : डॉ तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

अंबाजोगाईत लोकमतच्या रक्तमहायज्ञाला दात्यांकडून प्रतिसाद लोकमत ने महाराष्ट्राशी रक्ताचे नाते निर्माण केले-डॉ तात्याराव लहाने अंबाजोगाईत लोकमतच्या रक्तमहायज्ञाला दात्यांकडून ...

अंबाजोगाईत लोकमतच्या रक्तमहायज्ञाला दात्यांकडून प्रतिसाद

लोकमत ने महाराष्ट्राशी रक्ताचे नाते निर्माण केले-डॉ तात्याराव लहाने

अंबाजोगाईत लोकमतच्या रक्तमहायज्ञाला दात्यांकडून प्रतिसाद

अंबाजोगाई, नेकनूर येथे लोकमत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई : लोकमत परिवाराने रक्तदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राशी रक्ताचे नाते निर्माण केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाबूजींच्या जयंतीचे औचित्य साधून ५ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. तात्याराव लहाने बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे तर व्यासपीठावर डॉ. भास्कर खैरे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. संदीप निळेकर, डॉ. शिला गायकवाड, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. विश्वजित पवार, डॉ. अरविंद बगाटे, डॉ. सुनीता बिराजदार, डॉ. अविनाश काशीद, डॉ. दामोदर थोरात, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक संतोष कुंकुलोळ, धनराज सोळंकी, प्रा. रोहिणी पाठक, विजय रापतवार, सुवर्णा गंगणे, संतोष पवार, अशोक कचरे, किरण भालेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. लहाने म्हणाले की, लोकमतने अगोदर समाजाशी मनाचे नाते जोडले. ते नाते आता रक्ताचे निर्माण झाले आहे. जेव्हा कोणतेही संकट, आपत्ती येते तेव्हा लोकमत परिवार महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आलेला आहे. आदरणीय विजयजी दर्डा व राजेंद्रजी दर्डा यांची समाजाशी नाळ घट्ट जुळलेली आहे. स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याचा वारसा हे दोघे बंधू पुढे अखंड चालवत आहेत, असे ते म्हणाले.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले की, कोरोनानंतर आता रखडलेल्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. आता रक्तसाठा गरजेचा असताना लोकमतने महाराष्ट्रात रक्ताचं नातं हे अभियान राबवून सामान्य रुग्णांना दिलासा दिला. यावेळी डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, संतोष कुंकुलोळ, प्रा. रोहिणी पाठक यांची भाषणे झाली.

रक्तगटाचे जनक कार्ल लॅण्ड स्टीनर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश जाजू यांनी, संचालन आनंद टाकळकर यांनी तर उपस्थितांचे आभार अविनाश मुडेगावकर यांनी मानले.

यांचे मिळाले सहकार्य

भारतीय जैन संघटनेचे धनराज सोळंकी, साहिल मुथा, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या प्रा. रोहिणी पाठक, दामोदर थोरात, कल्याण काळे, गणेश राऊत, नरसिंग दरगड, संतोष मोहिते, आधार माणुसकीचा ग्रुपचे ॲड संतोष पवार, सुलोचना पवार, अशोक कचरे मित्रमंडळ, किरण भालेकर मित्रमंडळ, पवन गिरवलकर, श्रमकरी ग्रुपचे रवींद्र देवरवाडे, डॉ. केदार कुटे, विक्रम चहाचे नरसिंग दरगड, नीलेश गिरवलकर, तर सर्व रक्तदात्यांना धनराज सोळंकी यांच्या वतीने सॅनिटायझर बॉटल भेट देण्यात आली.

धारूर येथे उद्या शिबिर

धारूर : ऐतिहासिक धारूर शहरातसुद्धा किल्ले धारुर युथ क्लब, किल्ले धारूर रोटरी क्लब, कायाकल्प फाउंडेशन, श्रीहर्ष प्रतिष्ठान, वसुंधरा मित्र मंडळ, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, श्री हनुमान मित्र मंडळ, नवक्रांती युवक मंडळ, वसुंधरा मित्रमंडळ किल्लेधारूर या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ७ जुलै रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत डॉ. पी. एस. मुंडे यांचे रुग्णालय, वीरशैव लिंगायत मठ, क्रांती चौक, किल्ले धारूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून रुग्णांचा जीव वाचवून एक आदर्श सामाजिक उपक्रम घडवून आणावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

रक्तदानासाठी यांच्याशी संपर्क साधा

अनिल महाजन ९९२२९९९६७१, गौतम शेंडगे ९८६०६२१२९८, संजित कोमटवार ९४२२४६७८८९, दिनेश कापसे ९४२३१७१७७८, विजय शिनगारे ९४२३६९२८१८, सादेक इनामदार ९६९३१६१६१६, मदनराव धोत्रे ९४२३३४२९८९, अमरजित तिवारी ९७७०३८८३३८, रोहन हजारी ९९२१९४६००७ या क्रमांकावर रक्तदान शिबिरासाठी संपर्क साधावा.

050721\img-20210705-wa0147_14.jpg