शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या दराने किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

बीड : इंधन दराचा भडका दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे. कोरोनामुळे विविध समस्यांचा सामना ...

बीड : इंधन दराचा भडका दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे. कोरोनामुळे विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यातच मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक दरात वाढ झाली, परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खाद्यतेलाच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. १७५ रुपये लिटरपर्यंत तेलाचे भाव झाले. किराणा, भाजीपाला महाग झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

डिझेल दरवाढ होताच त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सामान्यांना भोगावे लागत आहेत. कोरोना लॉकडाऊनकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत होत असलेली वाढ सामान्य जनतेने नाईलाजाने पचविली असली, तरी कुटुंबाचे किचन बजेट बिघडलेले आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे फळे आणि भाज्याही महाग झाल्या आहेत. मागील वर्षभरात डिझेलच्या दरात लिटरमागे १२ ते १५ रुपयांची, तर तर पेट्रोलच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली. इंधनात ३५ ते ४० टक्के दरवाढ झाल्याने बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. यातच गॅस सिलिंडरचा प्रवास हजारीच्या दिशेने चालला आहे. वर्षभरात गॅस २०० रुपयांनी महाग झाला आहे.

असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल

जानेवारी २०१८ -- ८०

जानेवारी २०१९ -- ८१

जानेवारी २०२० -८२

जानेवारी २०२१ -९२

फेब्रुवारी - ९७.३४

मार्च - ९७.२०

एप्रिल -९७.६०

मे - १००.१९

जून - १०३

जुलै - १०६.५८

डिझेल

जानेवारी २०१८- ६९

जानेवारी २०१९ -६७

जानेवारी २०२० -७२

जानेवारी २०२१ - ८४

फेब्रुवारी - ८८.४४

मार्च - ८६.१०

एप्रिल -८७.१०

मे - ९२.१७

जून -९६.००

जुलै - ९६.७२

शेवगा, दोडका ८० रुपये किलो

उन्हाळ्यात ३० ते ४० रुपये किलोपर्यंत भाज्या खरेदी करता आल्याने सामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र जूनपासून पावसामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. शेवगा, दोडका ८० रुपये किलो आहे. फ्लॉवर, पत्ताकोबी, वांगी, भेंडी पन्नास ते साठ रुपये किलोने विकली जात आहे. एरवी दोन रुपयाला मिळणारी कोथिंबीर, पालेभाज्यांची जुडी पाच रुपयांना एक याप्रमाणे मिळत आहे.

शेवगा ८०

दोडका ८०

कांदे ३०

बटाटे २०

टोमॅटो २० रुपये किलो

डाळ स्वस्त, तेल महाग

बाजारात डाळींचे भाव कमी झाले आहेत. चणा डाळीचे दर किलोमागे १३ ते १५ रुपयांनी उतरल्याने ६० रुपये आहेत. ११० ची तूरडाळही ९० ते ९५ रुपये किलो झाली. उडीद, मूग डाळीतही किलाेमागे १० ते १२ रुपयांची घसरण झाली आहे, तर सोयाबीन तेल १६० चे १४५ रुपये लिटर, तर सूर्यफूल तेल १८५ चे १६५ रुपये लिटर झाले असले तरी महागच आहे. पाम तेल व शेंगदाणा तेलाच्या दरात लिटरमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे.

ट्रॅक्टरची मशागतही महाग

बैल बारदाना कमी झाल्याने शेतीकामे ट्रॅक्टरने करण्यावर भर दिला जात आहे. हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. नांगरटीला एकरी २५००, तर एक बॅग पेरणीला व रूटरला प्रत्येकी एक हजाराचा भाव आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने शेती महाग झाली आहे.

--

घर चालविणे झाले कठीण

तेल खूप महाग झाले आहे. भाज्यांना फोडणी देताना फार विचार करता येत नाही. कोरोनामुळे आधीच उत्पन्न कमी आणि खर्च वाढला आहे. यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गॅस सिलिंडरला ८८० रुपये मोजावे लागत आहेत. घर चालविणे कठीण झाले आहे. - सुशिला किशोर गायकवाड, बीड.

---------

महागाईने सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. रोजच्या गरजा भागवताना अडचणी येत आहेत. तेल १७० रुपये, गॅस सिलिंडर ९०० रुपयांपर्यंत गेला आहे. डाळी महाग झाल्या आहेत. दैनंदिन आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. सर्व बाबी जिथल्या तिथे कराव्या लागत असल्याने यावर पर्यायदेखील काढता येत नाही. - मोहिनी दीपक सर्वज्ञ, बीड.

---------

तेलाचे भाव मागील कही दिवसांत १० ते १५ रुपयांनी उतरले आहेत. डाळीचे दरही काहीसे तुटले आहेत. डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने परराज्यातून येणाऱ्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. सध्या लागते तेवढेच खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी, बीड.

-------------

स्थानिक शेतकऱ्यांकडून मोजक्याच भाज्या बाजारात येत आहेत. फळभाज्या इतर जिल्ह्यातून मागवाव्या लागत आहेत. त्यामुळे वाहतूक दराचा परिणाम होतो. डिझेल महाग झाल्याने वाहतूक दरातही वाढ झाली. आपोआप भाज्यांचे भाव कमालीचे वाढले आहे. ग्राहकही कमी असल्याने आवकही कमी आहे. - हुजेब बागवान, भाजी विक्रेता, बीड.

---------