राजापूरमधून अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST2021-05-31T04:24:32+5:302021-05-31T04:24:32+5:30

बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात होता. याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या ...

Illegal sand extraction from Rajapur | राजापूरमधून अवैध वाळू उपसा

राजापूरमधून अवैध वाळू उपसा

बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात होता. याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार, २९ मे रोजी त्या ठिकाणी छापा मारून टिप्पर, ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्रास वाळू असा ३७ लाखांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गंगावाडी, राजापूर शिवारातील गोदावरी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात आहे. याची माहिती पथकप्रमुख विलास हजारे यांना मिळाली होती. त्यानुसार, छापा टाकून वाहने व वाळू असा ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात बाळू आसाराम पवार (रा.उक्कडगाव, ता.घनसावंगी, जि.जालना), आण्णासाहेब माणिक मोरे, हरिभाऊ कारभारी बोरडे (दोघे रा.गंगावाडी, ता.गेवराई), अमोल नवनाथ धनवडे (रा.तलवाडा, ता.गेवराई), भारत अण्णा कारके (रा.जातेगाव, ता.गेवराई) या पाच जणांवर पोलीस अंमलदार स्वप्निल खाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तलवाडा पोलीस करीत आहेत.

Web Title: Illegal sand extraction from Rajapur