दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST2021-03-25T04:31:39+5:302021-03-25T04:31:39+5:30

नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे ...

Ignore repairs | दुरुस्तीकडे दुर्लक्ष

दुरुस्तीकडे दुर्लक्ष

नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था

बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे.

अवैध प्रवासी वाहतूक वाढली

बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागांत सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीला नियंत्रित करण्याची मागणी आहे.

Web Title: Ignore repairs