शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गरम पाणी अंगावर पडल्याने आई भाजली तर मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

हीच ती गरम पाण्याची टाकी. गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात पाहुण्यांच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या ...

हीच ती गरम पाण्याची टाकी.

गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथील गणेशनगर भागात पाहुण्यांच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या अंगावर २ जुलै रोजी रात्री हिटर मधील गरम पाणी अंगावर पडल्याने या झालेल्या दुर्दैवी घटनेत आई किरकोळ भाजली तर मुलगा गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान ५ जुलै रोजी रात्री मृत्यू झाला. आई उपचार करून घरी आली आहे.

गोरख ज्ञानदेव कारांडे (वय ३७ ) व सत्यभामाबाई ज्ञानदेव कारांडे (वय ७५) आई व मुलगा (दोघे राहणार कळसंबर ता. जिल्हा बीड) हे कामासाठी तळणेवाडी येथे आले असता जावई विठ्ठल लक्ष्मण शेंडगे (रा. तळणेवाडी) यांच्या घरी २ जुलै रोजी रात्री जेवण करून एका खोलीत झोपले होते. बाजूला असलेल्या फायबर कॅनमध्ये हिटर मधील गरम करुन ठेवलेले पाणी झोपेत अंगावर पडल्याने यात आई किरकोळ भाजली होती. तिच्यावर बीड येथे उपचार करून घरी आणले होते. मात्र मुलगा गंभीर भाजल्याने त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने ५ जुलै रोजी रात्री मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोरख कारांडे मिस्त्री काम करत होता. मागील दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे नाशिक येथे काम करत होता. मात्र सोय लागत नाही म्हणून मिस्त्री काम करण्यासाठी तळणेवाडी येथे आला होता. सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी लावलेले हिटर पाणी अधिक प्रमाणात तापल्याने फायबर ड्रम पघळून खाली कलवंडले व जवळच झोपेत असलेल्या मायलेकराच्या अंगावर उकळते पाणी पडले होते. आई किरकोळ भाजली तर मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोरख कारांडेच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे.

060721\sakharam shinde_img-20210706-wa0036_14.jpg~060721\sakharam shinde_img-20210706-wa0037_14.jpg