झोपेतच गळा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:47+5:302021-07-03T04:21:47+5:30

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील लाटे बाभळगाव येथील एका २१ वर्षीय युवकाचा रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने ...

I cut my throat while sleeping | झोपेतच गळा कापला

झोपेतच गळा कापला

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील लाटे बाभळगाव येथील एका २१ वर्षीय युवकाचा रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने गळा कापल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुलै रोजी रात्री घडली. या घटनेमुळे बाभळगाव परिसरात दहशत निर्माण झाली.

बाभळगाव येथील मारुती नारायण गाडेकर (वय २१ वर्ष) हा युवक गावाशेजारीच असलेल्या शेतातील आखाड्यावर नेहमीप्रमाणे आपल्या भावासह झोपला होता. रात्री १२ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने येऊन गुप्तीने त्याचा गळा कापला. मात्र तो सावध झाल्यामुळे सदर व्यक्तीने तेथून दुचाकीवरून पळ काढला. जखमी अवस्थेत मारुती व त्याचा भाऊ विलास यांनी पळालेल्या हल्लेखोराचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत तो पसार झाल्याची माहिती मिळाली.

या घटनेत मारुती गाडेकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना चोरीच्या उद्देशाने घडली की पूर्ववैमनस्यातून घडली, याबाबत चर्चा, तर्कवितर्क सुरू आहेत.

दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि प्रभा पुंडगे, फौजदार विठ्ठल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, घटनास्थळावरून गुप्ती हत्यार हस्तगत केले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

या घटनेतील हल्लेखोरांनी वापरलेली मोटरसायकल ही शाईन कंपनीची असून नंबरप्लेट काढलेली होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

020721\img_20210702_142132_869_14.jpg

Web Title: I cut my throat while sleeping