ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 16:08 IST2021-09-06T16:06:08+5:302021-09-06T16:08:32+5:30

सुदैवाने पाण्याच्या लाटेने हा बालक बाहेर फेकला गेल्याने वाचला.

Heartbreaker! The drowning boy survived; But the three who saved him drowned | ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले

ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले

- राम लंगे
वडवणी ( बीड ) : नदी पात्रातील बंधाऱ्यात बुडणाऱ्या मुलास वाचविणारेच बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना वडवणी तालुक्याती पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली. सुदैवाने यात बुडणारा मुलगा वाचला असून तिघे जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.  

एक सहा वर्षाचा बालक नदी पात्रातील बंधाऱ्यात बुडत होता. त्याला वाचविण्यासाठी गावातीलच दोन तरूणांनी उडी घेतली. सुदैवाने पाण्याच्या लाटेने हा बालक बाहेर फेकला गेल्याने वाचला. परंतू हे तरूण बुडत होते. एवढ्यात काठावर उभा असलेल्या बुडणाऱ्यापैकी एका मुलाच्या वडिलांनी पाण्यात उडी घेतली. यात दुर्दैवाने तिघेही बुडाले. 

यातील वडिलांचा मृतदेह सापडला असून दोन तरूणांचा शोध प्रशासनाकडून सुरूच होता. या ह्रदयद्रावक घटनेने मन सुन्न झाले आहे. बुडालेल्या व्यक्तींची ओळख पटविणे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - 

पिस्तूलाचे गूढ कायम ! करूणा शर्माच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?

करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

Web Title: Heartbreaker! The drowning boy survived; But the three who saved him drowned