शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनीला शासनाकडून आर्थिक साहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

नांदुरघाट : मेमध्ये अवकाळी पावसादरम्यान नांदुरघाट शिवारामध्ये गीताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. गीताबाई ...

नांदुरघाट : मेमध्ये अवकाळी पावसादरम्यान नांदुरघाट शिवारामध्ये गीताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. गीताबाई यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. या दाम्पत्याला सोळा वर्षांची एकच मुलगी अश्विनी असून आई-वडिलांचे छत्र हरवल्याने अनाथ झाली. तिच्या शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंद थोरात यांनी घटना झाल्याबरोबर किराणा व शालेय साहित्य दिले होत;. परंतु अश्विनीला मोठा आधार आवश्यक होता. याबद्दल स्थानिक पत्रकार अमोल जाधव यांनी केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा व सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्याकडे व्यथा मांडली. यावर मुंदडा यांनी अश्विनीला शासन स्तरावर लवकरात लवकर मदत केली जाईल, असा शब्द दिला. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामधून मंडळ अधिकारी, तहसीलदारांचा अहवाल करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अश्विनीला चार लाख रुपये मदत मंजूर करून घेतली. सोमवारी पिटीघाट येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, मंडळ अधिकारी नन्नवरे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार, डॉ. वसुदेव नेहरकर, अशोक मोराळे राजाभाऊ मुंडे , पिटी घाटचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या हस्ते अश्विनी ठोंबरे हिला चार लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश देण्यात आला.

या रकमेमुळे अश्विनीच्या भविष्यातील बहुतांश चिंता मिटणार आहे.

050721\1625476787359_14.jpg