शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसाठी शासनाची घंटा, पण पालक काय ठरवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

बीड : कोरोनाची लाट ओसरत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते ...

बीड : कोरोनाची लाट ओसरत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीजे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या असून संबंधित गावातील ग्रामपंचायतीने पालकांशी चर्चा करून ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात ७४७ ग्रामपंचायती कोविडमुक्त असल्याने स्थानिक पातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

कोविड संसर्गामुळे एक वर्षापासून शाळा बंद व मुले घरी राहिल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झले. सामाजिक कौशल्यांचे नुकसान झाले तसेच मोबाईल, इंटरनेटचा गैरवापर, व गेम्सच्या आहारी गेले आहेत तसेच नैराश्य वाढले आहे.अनेक मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिल्याने मानसिक तणाव वाढले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉपआऊट व घर, शेतीकामात ठेवण्यामुळे सामाजिक नुकसान लक्षात घेत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ होण्यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोनाची लाट उतरणीला लागली आहे. ७४७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झालेल्या आहेत. या ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून लवकरच चाचपणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी संगितले.

----

कोविडमुक्त क्षेत्रात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. यासंदर्भात आवश्यक माहिती संकलित करत आहोत.

- डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी, (मा.), बीड.

--------

वडवणी १९, अंबाजोगाई ८१, बीड १८०, गेवराई ७७, आष्टी ४७, पाटोदा ३९, शिरूर ०, माजलगाव ७१, धारूर ५१, केज १०५, परळी ७७ , एकूण ७४७

----------

जिल्ह्यात ७४७ ग्रामपंचायती कोविडमुक्त असल्या तरी त्या ठिकाणी माध्यमिक शाळा व ११ वी आणि १२ वीचे वर्ग असतीलच असे नाही. त्यामुळे किती गावांमध्ये शाळा सुरू करता येतील तसेच किती ग्रामपंचायती पालकांशी चर्चा करून ठराव करतील, या बाबी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

----------

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा

खासगी व्यवस्थापनाच्या शाळा ७१२

जिल्हा परिषदेच्या शाळा ५६

एकूण ७६८

------------