शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 6:13 PM

बीड-नगर रोडवर झालेल्या अपघातात एक वनमजूर गंभीर जखमी 

कडा :  रोपवन क्षेत्राची पाहणी करून परतणाऱ्या दोन वनमजुराच्या दुचाकीला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वनमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक वनमजूर गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही अपघात बुधवारी दुपारी वटणवाडी येथे बीड-नगर रोडवर झाला असून बाळासाहेब किसन खुळपे असे मृत वनमजुराचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथील रहिवासी असलेले बाळासाहेब खुळपे हे आष्टी येथील वनविभागात वनमजुर म्हणून नोकरीला होते. बुधवारी सकाळी ते सहकारी गौतम विश्वबंर टेकाळे यांना सोबत घेऊन  नांदा येथील रोपवन क्षेत्राची पाहणीसाठी गेले होते. पाहणीनंतर दुपारी दुचाकीवरून (एम. एच.  16,  ए.एन. 9562) दोघेही कार्यालयाकडे परतत होते. दरम्यान,  आष्टीवरून नगरकडे जाणार्‍या एका भरधाव चारचाकीने (एम. एच.  15, जी. आर. 0531) वटणवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 

यात दोन्ही वनमजूर गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले. मात्र गुरूवारी पहाटे बाळासाहेब खुळपे ( 54) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वनमजूर गौतम टेकाळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. आष्टी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक मनोजकुमार खंडागळे करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीडforestजंगल