शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आणखी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:53 IST

यात बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश असून चौथी घटना ही उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. 

आष्टी/अंबाजोगाई/केज (जि. बीड)/येडशी (जि. उस्मानाबाद) : आर्थिक कणा मोडल्याने कोलमडून पडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून गेल्या पंधरवड्यापासून त्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारीही चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली. यात बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश असून चौथी घटना ही उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. 

पहिल्या घटनेत बीड जिल्ह्यातील शेकापूर (ता. आष्टी) येथील जालिंदर नामदेव शिंदे (५२) या शेतकऱ्याने नापिकी व खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेतला. जालिंदर शिंदे हे शेतातील काही हाती लागले नसल्याने नैराश्यात होते. यातच त्यांनी जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणाची नोंद आष्टी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हवालदार नवनाथ काळे हे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत पिंपळा धायगुडा (ता. अंबाजोगाई) येथील प्रताप मोहनराव धायगुडे (४०) या शेतकऱ्याने आत्महत्या केली.प्रताप धायगुडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त झाले होते. आर्थिक विवंचनेतून ते नेहमी तणावात असत. अखेर त्यांनी शनिवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.तिसऱ्या घटनेत येवता (ता.केज) येथील  विष्णूपंत कुंडलिक काळे (५२) या शेतकऱ्याने शनिवारी रात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री घडली. परतीच्या पावसाने हातात आलेली पिके हातची गेली. त्यामुळे मुलींच्या लग्नासाठी घेतलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे. कुटुंबाचा उदरिनर्वाह कसा चालवावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे.  

उस्मानाबादेत तरुण शेतकऱ्याने घेतला गळफासउस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील सचिन विजयसिंह वीर (२६) या तरुण शेतकऱ्याने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजता घडली.सचिन वीर यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादन खर्चही हाती पडतो की नाही, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि. बी.बी. नाईकनवरे व हेकॉ. विजयानंद साखरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हेकॉ. साखरे हे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMarathwadaमराठवाडा